#अँड.ईश्वर घाडी यानी दिल्या शुभेच्छा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथे जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी दि १२ जुलै रोजी लोकआदालतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी घटस्पोट दवा दाखल केलेल्या दांपत्याला एकत्र करून नांदण्यास तयार झालेल्या दांपत्याचा खानापूरचे सिनिअर सिव्हिल जज्ज चंद्रशेखर तलवार यांच्यावीने दांपत्याला पुष्पहार व पेढे भरवुन नविन संसारच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शुभेच्छा देताना वकिल संघटनेचे अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी यानी संसारचे महत्व विषेद केले.
शनिवारी दि १२ जूलै रोजी झालेल्या लोकअदालतीत १९९ विविध प्रकारच्या केसीस निकालात काढल्या. तसेच ४ कोटी ७९ लाख रूपयाचा रेव्हणू वसुल करण्यात आला.
यावेळी वकिल संघटंनचे अध्यक्ष अँड ईश्वर घाडी,अँड.आर एन पाटील,अँड.पी वाय पाटील,श्रीमती बी एस नदीकर्ली,अँड.कळेकर,अँड एम ए मुल्ला, जी एम देसाई, अँड लंगोटी,,एस आय पाटील, अँड कपलेश्वरी,अँड गदीकेरी आदी उपस्थित होते.