#खानापूरात हायस्कूलचे शिक्षण!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर मराठ मंडळ हायस्कूलचे माजी विद्यार्थी व कारवार जिल्ह्यातील (ता. शिर्सी ) हुलेकलचे विभागाचे (आरएफओ) विभागीय अरण्य अधिकारी शिवानंद संभाजी निंगाणी याना जंगल व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी दाखवलेल्या साहसपूर्ण कामगिरीसाठी २०२४ चे मुंख्यमंत्री पदक जाहीर झाले आहे. आठ वर्षाच्या कार्यकाळात शिवानंद यानी आडीचशेहुन अधिक प्रकराणांचा तपास मार्गी लावला आहे. बेकायदा वन अतिक्रमणाना लगाम घालणे , लाकडाची तस्करी रोखणे,शिकारीला प्रतिबंध यासारख्या कारवाया राबविल्या आहेत .
त्याची दखल घेत पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.
एससीएफ एस एस निंगाणी यांचे सुपूत्र होत.