#शिक्षकावर अतिरिक्त कामाचा ताण!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सरकारी कामाचा बोजा दिवसे दिवस शिक्षकावर टाकला जात आहे.सरकारी शाळातील शिक्षकाना अध्यायनाव्यतिरिक्त इतर कोणतेही कामे लावू नये.शिक्षकानी परवानगी शिवाय कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ नये .अशी स्पष्ट सुचना करण्यात आल्या होत्या. तसेच निवडणुक कामापासुन दुर ठेवले होते.
शिक्षण खात्याच्या मुख्य आयुक्ताना काही दिवसापूर्वी पत्रक काढुन शिक्षकानी अध्ययनाव्यिरिक्त कोणतेही काम लावू नये .असे सांगीतले होते .
राज्याच्या मुख्यनिवडणुक अधिकार्यानी पत्रक जाहीर करून सर्वोच्च न्यायालयात आणि भारत निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार शिक्षकाना बी एलओ म्हणून काम करण्याचा आदेश दिला आहे.त्यामुळे सरकारी शाळांच्या शिक्षकावर अतिरिक्त
कामाचा ताण वाढला आहे.
त्यातच सर्वोच न्यायालय व भारत निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार शिक्षकाना मतदान केंद्रस्तरीय अधिकरी ( बी एलओ ) म्हणून काम करावे लागणार आहे .
तेव्हा शिक्षकाना त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी संदर्भात दिले जाणारे प्रशिक्षण आणि इतर कामे करावी लागणार आहे.
अशी माहिती कर्नाटक राज्याच्या मुख्यनिवडणुक अधिकार्यानी पत्रकाव्दारे याबाबतची माहिती दिली आहे.