#जीवीत हानी टळली!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका अति पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. दररोज सुसाट वार्यासह मुसळधार पाऊस पडत असतो. त्यामुळे झाडे कोसळणे ,घरे कोसळणे अशा घटना नेहमीच घडत असतात .
रविवार दि.६ रोजी सायंकाळी सुसाट वार्यासह पडलेल्या पावसामुळे कुप्पटगिरी (ता खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीचे पत्रे उडुन गेल्याने शाळेतील साहित्य पावसामुळे भिजवुन गेल्याने प्रचंड नुकसान झाले .
दैव बलवत्तर रविवारी शाळेला सुट्टी मुळे जीवीत हानी टळली.
रविवारी सायंकाळी ही घटना घडली. रविवारचा दिवस असल्याने कोणी विद्यार्थी ,शिक्षक शाळेकडे फिरकले नाही.अन्यथा सायंकाळच्यावेळी शाळा सुटण्याची वेळ मुले घरी जाण्यासाठी शाळेतुन बाहेर पडतात.अशा वेळी मोठा अनर्थ घडला असता.
रविवारचा दिवस असल्याने शाळेशेजारी असलेल्या कुंटूंबानी ही घटना पाहिली.
सोमवारी खानापूर तालुक्याचे बीईओ पी रामाप्पा ,आमदार विठ्ठलराव हलगेकर याना घटनेची माहिती देण्यात आली.लागलीच बीईओ पी रामाप्पा यानी घटनास्थळी जाऊन भेट दिली.यावेळी अक्षरदासोह अधिकारी,बी आर पी,व सीआरपी व इतर अधिकारी उपस्थित होते.
आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी शाळेच्या इमारतीला पत्रे घालुन देण्यासाठी संबधीत अधिकार्याना सुचना दिल्या.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य भाऊ गंगाराम पाटील ,ग्राम पंचायत पीडीओ अधिकारी श्री स्वामी ,एसडीएमसी कमिटीचे अध्यक्ष गणपती मुतगेकर, उपाध्यक्ष गजानन पाटील ,व इतर सदस्य ,सदस्या व पालक वर्ग उपस्थित होते.