#विद्यार्थ्याना बचत बॅके विषयी माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यासाठी बॅकेच्या व्यवहाराचे ज्ञान व्हावे .यासाठी बचत बॅकेचा अनावरण कार्यक्रम नुकताच पार पडला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता सायनेकर या होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून नागरगाळी केंद्राचे केंद्रप्रमुख एन के पाटील तसेच खानापूर क्लस्टरचे केंद्रप्रमुख श्री वेंकटी आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत जे पी पाटील यानी केले.
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व फोटो पुजनाने झाली .
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आणि आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सादरी कार्यक्रमाला शाळेचे ज्येष्ठ शिक्षक विलास सावंत, एच एल करंबळकर, टी बी मोरे ,कन्नड शिक्षिका जे बी होसुर अतिथी शिक्षिका स्नेहल चौगुले, एस डीएमसी अध्यक्ष धाकलु गुरव तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते
आभार जे पी पाटील यानी मानले .