#विधुत खांब मोडुन पडले!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सध्या खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे झाडे कोसळने ,विधुत खांब पडणे. अशा घटना घडत आहेत.
असाच प्रकार माणिकवाडी ( ता.खानापूर ) येथे मंगळवारी दि १ रोजी ११ वाजण्याच्या दरम्याने प्राथमिक मराठी शाळेच्या जवळ असलेले सागवान झाड उंबळुन विधुत तारावर पडल्याने या परिसरातील दोन ते तीन विधुत खांब मोडून पडले.त्यातील एक खांब पत्राच्या घरावर पडल्याने मोठा जोराचा आवाज आला. लागलीच घरातील लोकानी घाबरून घराबाहेर धाव घेतली.मात्र जीवीत हानी टळली.
रात्री ११ वाजता सागवानी झाड उंबळुन विधुत तारावर पडले .त्यामु़ळे दोन विधुत खाब मोडुन पडले.त्यातील एक विधुत खांब शावेर परेरा यांच्या घरावर कोसळले. यावेळी विधुत तारांचे एकमेकावर घर्षण झाल्याने शाॅर्ट सर्किट होऊन मोठा आवाज आला. व विधुत तारा रस्त्यावर विखुरल्या गेल्या. शाँर्ट
सर्किटच्या आवाजाने गावचे कार्यकर्ते महादेव गावडे व शावेर परेरा जागे झाले.
लागलीच ही बातमी ग्राम पंचायत सदस्य
व प्रा.शंकर गावडा याना कळविण्यात आली. प्रा.शंकर गावडा यानी लाईनमन रणजित व अधिकारी नागशे देवलतकर यांच्याशी संपर्क साधुन घटनेची माहिती दिली.
लागलीच लाईनमन रणजीत यानी वीज पुरवठा खंडीत केला. त्यानंतर प्रा.शंकर गावडा यानी सागवाणी झाडाच्या फांद्या मारून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.
सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने कोणतीच जीवीत हानी घडली नाही.अन्यथा शाळा लागुन होती . मोठा अनर्थ ़घडला असता.