#नगरपंचायतीत गणेशमुर्तीकारांच्या बैठकीत मार्गदर्शण!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील गणेश मुर्तीकारांनी येत्या गणेशोत्सवात प्लॅस्टर आँफ पँरीसच्या गणेशमुर्त्याची विक्री करू नये . शेडू मिश्रित मातीच्या गणेशमुर्ती कराव्यात. जेने करून प्रदुर्शनाचा त्रास होणार नाही. यासाठी खानापूर नगरपंचायतीच्या कार्यालयात गणेशमुर्तीकारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ . मिनाक्षी बैलूरकर होत्या. यावेळी उपनगराध्यक्षा सौ जया भुतकी, स्थायी कमिटी चेअरमन आप्पया कोडोळी,नगरसेवक प्रकाश बैलुरकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रेमानंद नाईक यानी केले.
तर उपस्थितांचे स्वागत चीफ आँफिसर संतोष कुरबेट यानी केले.
बैठकीत खानापूर शहरातील गणेश मुर्तीकारानी पॅरीस आँफ प्लॅस्टरच्या मुर्तीची विक्री करू नये .त्यामुळे प्रदुर्शनाचा प्रश्न येतो. शिवाय या मुर्त्या पाण्यात विरगळत सुध्दा नाहीत. रासायनिक कलर सुध्दा वापरू नका.
यासाठी शेडु मिश्रित मातीच्या गणेश मुर्त्या तयार करण्याचा सल्ला दिला.
यावेळी बोलताना मुर्तीकार जोतिबा कुंभार म्हणाले की, ही बैठक जानेवारीच्या महिण्यात घेतली असता आम्हाला निर्णय घेता आला. गणेशोत्सव काही दोन महिण्यातच राहिला अशा वेळी मुर्त्या सुकणे कठीण आहे. काही मुर्तीकारानी पीओपी मुर्त्या आदीच आणुन ठेवल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना १२ फुटी पर्यत गणेश मुर्त्या हव्या असतात. त्यामुळे अशा कमी वेळेत १२ फुट पर्यतच्या शेडूच्या गणेशमुर्त्या तयार करणे कठीण आहेत.केवळ ४ ते ५ फुटी शेडुच्या मुर्त्या तयार होऊ शकतात. त्यामुळे अनेक मुर्त्याकारानी पीओपी गणेशमुर्त्या मागविल्या आहे.मुर्त्याचे काम जोरात चालु आहे.अशी माहिती दिली.
गणेशमुर्त्या विसर्जणासाठी नगरपंचायतीकडुन खड्ड्याची सोय.
खानापूर नगरपंचायतीकडुन शहरातील दीड दिवसाचे,पाच दिवसाचे तसेच सात दिवसाचे घरगुती गणपती विसर्जणासाठी सोयीच्या ठिकाणी जेसीपीच्या सहाय्याने खड्डा खणुन त्यात प्लॅस्टीक टाकून घरगुती गणेशाचे विसर्जण करण्याबद्दल स्थायी कमिटी चेअरमन आप्पया कोडोळी यानी मत मांडले.
यावेळी मुर्तीकाराना गणेशमुर्ती कार्यशाळेसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. जेने करून सर्व मुर्तीकार एकत्र काम करतील अशी चर्चा ही करण्यात आली.
बैठकीला केवळ पाच मुर्तीकार उपस्थित होते.त्यामध्ये जोतिबा कुंभार केंचापूर गल्ली, नागो महादेव कुंभार,केंचापूर गल्ली,सोमनाथ चित्रगार कडोलकर गल्ली,किशोर जाधव निंगापूर गल्ली. आधी उपस्थित होते.
आभार प्रेमानंद नाईक यानी मानले.