#६ जुलै रोजी होणार वास्तुचा भुमीपुजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी.
निडगल ( ता. खानापूर ) गावच्या ग्रामस्थानी व वारकरी मंडळी याच्यावतीने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भक्तीनिवास उभारणीचा निर्णय घेतला असुन पंढरपूर येथे स्वता खरेदी केलेल्या जागेवर भक्ती निवास उभारणीचा निर्णय नुकताच झालेल्या बैठकीत करण्यात आला असुन .त्यानिमित्त येत्या आषाढी भागवत एकदशीच्या शुभ मुहूर्तावर रविवारी दि.६ रोजी दुपारी १२ वाजता वास्तूचा भूमीपुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अनिल कदम उपस्थित राहणार आहेत.
तर भूमी पुजन आमदार विठ्ठलराव हलगेकर याच्या शुभहस्ते होणार आहे.
तरी कार्यक्रमाला निडगल गावातील वारकरी,जेष्ठ उद्योजक,शेतकरी व व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.