#खानापूर बिडी मार्गावरील आपघात!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर बिडी महामार्गावरील झुंजवाड (के.एन.) फाट्यावर नंदगडहुन बिडीकडे जाणार्या दुचाकी स्वाराचा दुचाकी घसरून झालेल्या आपघातात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि.३० जुन रोजी घडली.
सदर युवकाचे नाव अयुम अकबर नाईक ( वय २५) तो धारवाड जिल्ह्यातील कोट्टूर गावाचा रहिवाशी आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खानापूर बिडी महामार्गावरून दुचाकीस्वार अयुम नाईक हा नंदगड हुन बिडीकडे जात होता. झुंजवाड (के.एन.) फाट्यावर येताच दुचाकी घसरल्याने तो रस्त्यावर आपटला.त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती नंदगड पोलिसस्थानकाला मिळताच लागलीच नंदगड पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला .व मृत्यूदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर सरकारी दवाखाण्यात पाठविला. नंदगड पोलिस स्थानकाचे पोलिस पुढील तपास करत आहेत.