#गर्लगुंजी ग्रा.पं.सदस्य प्रसाद पाटील यानी दिले निवेदन!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर (सुहास पाटील)
खानापूर तालुक्यातील गर्लगूंजी , इदलहोंड,शिंगिनकोप,खेमेवाडी,गणेबैल, निटूर, प्रभुनगर, माळअंकले, झाड अंकले , बाचोळी, शिवाजीनगर आणि इतर गाव जांबोटी येथील नेम्मदी केंद्र येथे जोडण्यात आली आहेत.पण गर्लगूंजी आणि जांबोटी चे अंतर अंदाजे २५ ते २७ की मी. आहे . शेतकरी विद्यार्थी आणि नागरिकांना प्रत्येक लहान सहान सर्टिफिकेट ,वारसा ,वार्षिक उत्पन्न दाखला , डोमीसैल, इतर सर्वच महसूल ,शैक्षणिक,आणि शेती विषयी कामासाठी जांबोटी येथे जाव लागत पण अंतर २५लकी.मी.असल्यामुळे आणि रस्ते खराब ,बस व्यवस्था,जंगली प्राण्यांची भीती या सर्व गोष्टींमुळे वरील पंचायती आणि गावातील नागरिकांना याचा भरपूर त्रास होत आहे त्यासाठी आज गर्लगूंजी ग्राम पंचायत सदस्य यांनी महसूल मंत्री कृष्ण भैरेगोडा याना कुसमळी येथे निवेदन देण्यान आले निवेदन देताना कलाप्पा लोहार,मारुती पांडूचे,सतीश बुरुड ,भर्तेश तोरोजी,गुड्डू टेकडी,विवेक तडकोड,सुरेश जाधव,देमांना बसरिकट्टी वगेरे उपस्थित होते..महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना याविषयी क्रम घ्या असे सांगितले आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. नेमदी केंद्र गर्लगूंजी येथे झाल्यास पूर्ण गर्लगूंजी, इदलहोंड, निटूर,हलकरणी,रामगुरवाडी पंचायत आणि या पंचायत मध्ये येणाऱ्या काही गावांना याचा फायदा होणार आहे असे ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी सांगितले..