हलकर्णी मराठी शाळेच्या कन्नड शिक्षिका सौ महादेवी हेगडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार!
#२९ वर्षाच्या शिक्षिकीसेवेतुन निवृत्त!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
हलकर्णी ( ता.खानापूर ) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या़ कन्नड शिक्षिकी सौ.महादेवी गणपती हेगडे या २९ वर्षाच्या शिक्षिकी सेवेतुन ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्या.
त्यानिमित्त त्याचा सत्कार सोहळा शनिवारी २८ रोजी वनमाला सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस डी एम सी अध्यक्ष कृष्णा चौगुले उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपाध्यक्ष वैशाली पाटील, अरूण कोडला,यल्लापा बाळेकुंद्री, एस एन कम्मार ,मुख्याध्यापक ए एम भोसले,राज्य शिक्षक संघटना संचालक व शिक्षक सोसायटी संचालक के एच कौंदलकर, शिक्षक सोसायटीचे चेअरमन एम व्ही कुंभार,माजी चेअरमन बी एम पाटील , नोकर संघटना अध्यक्ष बी एम यळ्ळूर, शिक्षक संघटना अध्यक्ष श्री सनदी, संचालक बी बी चापगांवकर, जे पी पाटील, श्री.चिचडी, टी बी मोरे ,जे पी पााटील , व्हणाप्पा मासेकर,भावकाणा चौगुले,नारायण खानापूरी, विठ्ठल असुडे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी सत्कारमुर्ती सौ महादेवी हेगडे व पती गणपती हेगडे व्यासपिठावर उपस्थित होते.
प्रास्ताविक सी आर पी सौ. रूपाली पवार यानी केले. स्वागत मुख्याध्यापक श्री बेळगावी यानी केले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन व फोटो पुजन उपस्थित मान्यवराच्याहस्ते करण्याच आले.
यावेळी उपस्थित मान्यवरानी सत्कारमुर्ती सौ महादेवी हेगडे यांच्या कार्याचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना सौ महादेवी हेगडे म्हणाल्या की २९ वर्षाच्या शिक्षकी सेवेत विद्यार्थ्याना घडविताना जो आनंद मिळाला असा इतत्र कुठेच मिळाला नसता.त्यामुळे स्वत:ला शिक्षिकि यानात्याने भाग्यवान समजते.
पुढे म्हणाल्या की माझ्या नोकरीची सुरूवात यल्लापूर तालुक्यातुन झाली. याला कारण आहे की ,मला शिकविलेल्या हायस्कूल शिक्षकांनी सांगीतले की तु शिक्षिका हो. आणि माझ्या मुलाला शिकव. सुदैवाने मला यल्लापूर तालुक्यात नोकरीची सुरूवात झाली.आणि माझ्या शिक्षकांच्या मुलाला शिकविण्याचे भाग्य मिळाले. यातच मला आनंद वाटला.त्यानंतर खानापूर तालुक्यात शिक्षिकी सेवा केली.आज २९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतुन मी सेवानिवृत्त झाले. आज सर्वानी उपस्थित राहुन माझा सत्त्कार केला. त्याबद्दल मी सर्वाची ऋणी आहे.
यावेळी शाळेच्यावतीने तसेच विविध शाळांच्यावतीने ,मित्रमंडळी,नातेवाईक आदीनी शाल,पुष्पहार,भेटवस्तू देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम व्ही चोर्लेकर यानी केले .आभार मुख्याध्यापक श्री.बेळगावी यानी मानले.