# पत्रकार परिषदेत माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील रस्ते सुधारणा ,रस्ते रूंध्दीकरण,तसेच पुल बांधणी सह जवळपास १७ विकास कामासाठी विविध सरकारी योजनेंतर्गत निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करून मंजुरू मिळविल्याची माहिती आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की ,बेळगांव पणजी महामार्गावरील मराठा मंडळ महाविद्यालय ते करंबळ क्राॅस पर्यतच्या रस्त्यासाठी ८ कोटी रूपये, तसेच नागरगाळी -काटकोळ महामार्गाच्या खराब रस्त्याच्या सुधारणेसाठी ९ कोटी रूपये ,लालवाडी बिजगर्णी,बिडी,मुगळीहाळ,गंदिगवाड-इटगी आदी रस्त्यासाठी ८ कोटी रूपये,सिंदनुर हेम्माडगा राज्य महामार्गाच्या निवडक भागाच्या विकासासाठी २० कोटी रूपये बिडी-बेळवणकी राज्य महामार्गाच्या तालुका सीमपर्यच्या रस्त्याच्या पुनर्बाधणीसाठी ३ कोटी रूपये,तसेच मुख्य रस्ते सुधारणा योजनेर्तगत बसरीकट्टी हलगा बेकवाड रस्त्यासाठी २ कोटी रूपये, यडोगा चापगाव हडलगा खैरवाड रस्त्यासाठी ८ कोटी रूपये, हलसाल करंजाळ भालके ते बेळगाव महामार्गासाठी २ कोटी रूपये,राष्ट्रीय महामार्गासाठी २ कोटी रूपये, बैलूर – देवचीहट्टी रस्त्यासाठी १.५० कोटी,भांबार्डा मडवाळ घोटगाळी रस्त्यासाठी पालक मंत्री सतीश जारकिहोळी याना विनंती केली आहे.
यासाठी एकूण ५३ कोटी रूपयाचे अनुदान द्यावेत. यामध्ये निलावडे ते निलावडे क्राॅस रस्त्यासाठी ३ कोटी रूपये,तसेच तालुक्यातील रस्ते व पुलाच्या सुधारणेसाठी निधी ही उपलब्ध करून देतील अशी माहिती आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी स्पष्ट केले.