#खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात सतत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामळे खानापूरची मलप्रभा नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील नदी,नाल्याना पूर आला आहे.
जिल्हा पंचायतीचे सी ई ओ राहुल शिंदे यानी खानापूर तालुक्याचा अतिवृष्टीचा दौरा केला. यावेळी मलप्रभा सह हलात्री नदीवरील पाण्याची पाहणी केली. हलात्री नदीवरील पुला पाण्याचा धोका येणार संपर्क तुटणार यांचा अंदाज घेतला होता.
त्यामुळे बुधवारी शाळाना सुट्टी जाहीर केली होती.
मात्र पावसाचा जोर वाढल्याने उद्या गुरूवारी दि.२६ रोजी ही सुट्टीचा प्रस्ताव बीईओ अधिकार्यानी केल्याने.तसेच अंगणवाडी,प्राथमिक,माध्यमिक शाळा तसेच पदवीपूर्व काॅलेजच्या विद्यार्थ्याच्या सुरक्षितेच्या हितासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी ,अध्यक्षाच्याकडे मागणी केल्याने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यानी बेळगावसह बेळगाव ग्रामिण,खानापूर व कित्तूर तालुक्याला उद्या गुरूवारी दि.२६ रोजी सुट्टी जाहिर केली आहे.
गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद खालील प्रमाणे.
- खानापूर : ९६ .२ मि.मी.
- नागरगाळी: ४७.६ मि.मी.
- बिडी: १८.२ मि.मी.
- कक्केरी : १७.२ मि.मी.
- असोगा: १०५ .२ मि.मी.
- गुंजी: ४८.६ मि .मी.
- लोंढा रेल्वे : ११० मि .मी
- लोंढा पी.डब्लू .डी. ७५.८मि.मी.
- जांबोटी: ११८.२ मि.मी.
- कणकुंबी : ५९ मि.मी इतका आहे.
- सर्वात जास्त पावसाची नोंद जांबोटी येथे ११८ .२ मि.मी.इतकी आहे.