#खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस!
#सी ई ओ राहुल शिंदेचा पाहणी दौरा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गेल्या चार दिवसापासुन खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामळे खानापूरची मलप्रभा नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील नदी,नाल्याना पूर आला आहे.
आज मंगळवारी दि २४ रोजी जिल्हा पंचायतीचे सी ई ओ राहुल शिंदे यानी खानापूर तालुक्याचा अतिवृष्टीचा दौरा केला. यावेळी मलप्रभा सह हलात्री नदीवरील पाण्याची पाहणी केली. हलात्री नदीवरील पुला पाण्याचा धोका येणार संपर्क तुटणार यांचा अंदाज घेतला.
यावेळी उद्या बुधवारी दि २५ रोजी अतिवृष्टीचा इशारा बेंगलोर हवामान खात्याने दिल्याने बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महमद रोशन यानी खबरदारीचा उपाय म्हणून खानापूरसह बेळगाव तालुक्यातील अंगणवाडीसह प्राथमिक,माध्यमिक शाळा,काॅलेजना बुधवारी दि.२५ रोजी सुट्टी जाहिर केली आहे.
गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद खालील प्रमाणे.
- खानापूर : ९६ .२ मि.मी.
- नागरगाळी: ४७.६ मि.मी.
- बिडी: १८.२ मि.मी.
- कक्केरी : १७.२ मि.मी.
- असोगा: १०५ .२ मि.मी.
- गुंजी: ४८.६ मि .मी.
- लोंढा रेल्वे : ११० मि .मी
- लोंढा पी.डब्लू .डी. ७५.८मि.मी.
- जांबोटी: ११८.२ मि.मी.
- कणकुंबी : ५९ मि.मी इतका आहे.
- सर्वात जास्त पावसाची नोंद जांबोटी येथे ११८ .२ मि.मी.इतकी आहे.