संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटीच्या चेअरमन पदी नगरसेवक आपय्या कोडोळीची बुधवारी दि.१८ रोजी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली.
यानिमित्त खानापूर डाॅक्टर असोसिएशनच्या वतीने सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी खानापूर डाॅक्टर असोसिएशनचे चेअरमन डाॅ. डी.ई.नाडगौडा यांच्यानेतृत्वाखाली खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटीच्या चेअरमन पदी निवड झाल्याबदल नवनिर्वाचित चेअरन आप्पया कोडोळी यांचा शाल ,पुष्पहार व पेढे भरून सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी खानापूर डाॅक्टर असोसिशन चेअरमन डाॅ.डी.ई.नाडगौडा,सचीव डाॅ.सागर नार्वेकर, डाॅ.सागर चिट्टी,डाॅ. जगदिश बुवा ,डाॅ. राम पाटील ,डाॅ.सुनिल पाटील आदी डाॅक्टर उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित स्थायी कमिटीचे चेअरमन आप्पया कोडोळी यानी कृतज्ञता व्यक्त केली.