
#पुरूषाचा मृतदेह आहे.
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बल्लोगा ( ता.खानापूर ) गावाजवळुन जाणार्या मलप्रभा नदीच्या पात्रात श्री बसवान्ना मंदिरापासुन काही अंतरावर पुरूषाचा मृतदेह दिसुन आला.
सध्या पावसाला सुरूवात झाली असुन मलप्रभा नदीत पाणी आले असुन काही ठिकाणी पाणी कमी झाल्याने अनोळखी पुरूष जातीचा मृत्यूदेह नदीतील एका खडकावर दिसुन आला आहे.
सदर घटनेची माहिती खानापूर पोलिस देण्यात आली . लागलीच खानापूर पोलिसानी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह थाब्यात घेतला आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.