भीमगड अभयारण्यातील अनेक खेड्डयात आडचणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अतिजंगलाने व्यापलेला यामध्ये भीमगड अभयारण्यात येणार्या खेड्यातील नागरीकांना पावसाळा सुरू झाला की अनेक समस्यांना तोंड द्यावे.
कधी जंगलातील झाडे पडुन रस्ता बंद होतो.तर अतिपावसामने नदी ,नाल्याना पुर आल्यामुळे खेड्यांचा संपर्क तुटतो. त्यामुळे दहा दहा दिवस या खेड्याना बेटाचे स्वरूप येते.
अशाच प्रकारे गेल्यादोन दिवसा पूर्वी सततच्या पावसामुळे पास्टोली ( ता.खानापूर ) गावच्या रस्त्यावर भले मोठे झाड पडून रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे पास्टोली गावच्या नागरीकाना दुचाकी अथवा चारचाकी वाहना वरून येजा करण बंदच झाले आहे.
त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी येजा करणे ,विद्यार्थ्याना परिक्षेला जाणे ,शाळेला जाणे कठीण झाले आहे. तेव्हा संबधीत वन खात्याने याकडे लक्ष देऊन झाडाचा बंदोबस्त करावा.अशी मागणी पास्टोली नागरीकातुन होत आहे.
पावसाळ्यात साकवाचा आधार!
खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील खेड्यांना पावसाळ्यात नदी नाल्याना पुर आला तर संपर्क तुटतो. त्यामुळे भीमगड अभयारण्यातील खेड्यातील नागरीकाना नदी ,नाले पार करण्यासाठी साकवाचाच आधार असतो,
पावसाच्या सुरूवातीला या भागातील नदी नाल्यावर साकाव घालुन तालुक्याच्या ठिकाणी येजा करावी लागत असते.
अशा अनेक समस्यांना पास्टोली सह अनेक खेड्यांतील नागरीकांना तोंड द्यावे लागत आहे.
परंतु आजतागायत कोणत्या ही आमदारानी ,लोकप्रतिनिधी मंत्र्यानी समस्यां सोडविण्यासाठी प्रयत्न केेले नाही.ही खेदाची गोष्ट आहे.
# देगावची हीच परिस्थिती आहे.
अनंत गावडे.
इतर खेड्याप्रमाणे देवगावची ही परिस्थीती आहे.मात्र आमदारांचे साफ दुर्लक्ष होत असल्याची तक्रार देगावचे सामाजिक सेवक अनंत गावडे याचे म्हणने आहे.
ते म्हणतात देगाव गावच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात देगावच्या नागरीकाना नरक यातना सोसाव्या लागत आहे.येत्या पावसाळ्यात देगावच्या नागरीकाना गावच्या बाहेर पडणे मुष्कील होणार आहे.तेव्हा यापुढे होणार्या कोणात्याही निवडणुकीवर भहिष्कार घालण्याचा निर्धार अनंत गावडे यानी बोलुन दाखविले.