
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
मणतुर्गा (ता. खानापूर ) येथे श्री नागेश महारूद्र मंदिराचा लोकार्पण सोहळा आज सोमवारी दि.९ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी कळसारोहण डोंगरगांव मठाचे श्री प.पू.पिरयोगी भयंकर नाथजी महाराज याच्याहस्ते होणार आहे.
लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वतनदार गावडू पाटील असतील. मंदिराचा लोकार्पण माजी मंत्री व आमदार रमेश जारकिहोळी ,आमदार विठ्ठल हलगेकर,यांच्याहस्ते होणार आहे.
गाभार्याचा लोकार्पण सोहळा माजी आमदार अरविंद पाटील,माजी आमदार अनिल बेनके,माजी आमदार दिगंबर पाटील ,किरण जाधव, उद्योजक अविनाश पाटील, आदीच्याहस्ते होणार आहे.
दिपप्रज्वलन भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी जि.प. सदस्य जोतिबा रेमाणी,बाबूराव देसाई,सुरेश सुळकर ग्राम पंचायत अध्यक्ष ,निरंजन सरदेसाई, अमृत शेलार चेअरमन अर्बन बॅक, काॅग्रेस ब्लाॅक अध्यक्ष अँड ईश्वर घाडी आदीच्या हस्ते होणार आहे.
विविध फोटोचे पुजन पुजन माजी जि.प.सदस्य विलास बेळगावकर, नगराध्यक्षा सौ मिनाक्षी बैलुरकर,नगरसेवक प्रकाश बैलुरकर,दिपक पाटील , भाजप नेत्या सौ.धनश्री सरदेसाई,डाॅ.सोनाली सरनोबत,एम.डी.सदानंद पाटील आर एफ.ओ. श्रीकांत पाटील,अभिजीत सरदेसाई,भाजप कार्यकर्ते गुंडू तोपिनकट्टी पंडित ओगले,आदीच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असुन प्रमुख वक्ते म्हणून भाजप तालुका माजी अध्यक्ष संजय कुबल उपस्थित राहातील.
तरी कार्यक्रमाला सर्वाना उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.