
# ता. पं . फंडातुन उभारली इमारत !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सिंगीनकोप ( ता.खानापूर )येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेसाठी नविन इमारतीची मागणी गेल्या अनेक वर्षापासुन होत होती. गावचे समाज सेवक व इदलहोंड ग्राम पंचायतीचे माजी सदस्य कृष्णा कुंभार यांच्या प्रयत्नातुन शाळेच्या इमारतीसाठी तालुका पंचायतीच्या फंडातुन १२ लाखाचा निधी मंजुर करून इमारतीची सोय करून घेतली.
आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते नुतन इमारतीचे भुमी पुजन व पाया खोदाई करून आज सुसज्ज इमारत उभारण्यात आली.
केवळ तीन महिण्यात सुसज्ज इमारत उभारण्यात आली असुन सदर इमारतीचे बांधकाम अभियंते अमोल कुंभार यानी केले आहे.
सदर सुसज्ज इमार आता उदघाटनच्या प्रतिक्षेत असुन लवकरच नुतन इमारतीचे उदघाटन व्हावे .अशी मागणी सिंगीनकोप गावच्या शिक्षण प्रेमीतुन होत आहे.