
#माजी आमदाराचे प्रयत्न.आजी आमदाराना श्रेय!
# खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी दिली माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सध्या खानापूर तालुक्यात विकास कामे आली आहेत. ती केवळ आणि केवळ माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर याच्या काळात व त्याच्या प्रयत्नाने मंजुर झालेली विकास कामे आहेत.
माजी आमदार डाॅ अंजली निंबाळकर यानी आपल्या काळात कामाच्या मंजुरीसाठी केलेला पाठपुरावाच कारणीभूत आहे. तेव्हा माजी आमदाराच्या प्रयत्नाचे श्रेय भाजपच्या आमदारानी घेऊ नये. अशी माहिती खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी बोलताना दिली.
यावेळी ते म्हणाले की, खानापूर शहरात अमृतयोजनेंतर्गत मंजुर झालेली २० कोटी रूपयाचे अनुदान हे माजी आमदार डाॅ.निंबाळकर यानी केलेल्या महत्वपूर्ण पाठपुरव्यामुळेच मंजुर झाले हे विसरून चालणार नाही.
त्याचबरोबर नगरोत्थान योजनेतुन शहरातील विकास कामासाठी मंजुर झालेले ५ कोटी रूपये हे सुध्दा माजी आमदारांच्या काळात झाले आहे.
शिवाय आज भुमीपुजन झालेल्या रामगुरवाडी सीसीरस्ता विकासासाठी १६ लाख रूपये,तसेच सरकारी पी यू काॅलेजच्या दोन वर्ग खोल्या साठी ५० लाख ५० हजार रूपये अनुदान मंजुरीची प्रक्रिया माजी आमदारांच्या काळातच मंजुरी मिळाली होती.
असे असताना भाजपच्या आजी आमदारानी काॅग्रेसच्या माजी आमदारानी मंजुर करून आणलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये. या सर्व विकास कामाच्या मंजुरीसाठी माजी आमदारानी सरकारला सादर केलेली कागद पत्रे शिवाय राज्य सरकारने दिलेल्या मंजुरीचा आदेश यावेळी दाखवला. सर्व माहिती दिली.