
# वाढदिवसानिमित्त थोडक्यात परिचय!
संदेश क्रांंती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
मणतुर्गा ( ता.खानापूर ) गावचे सुपूत्र व खानापूर तालुका भाजपचे सचिव श्रीमान गजानन गावडु पाटील यांचा आज गुरूवार दि.२८ नोव्हेबर हा जन्मदिन या जन्मदिनी त्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभच्छा !
श्रीमान गजानन गावडू पाटील यांच्या जन्म मणतुर्गा ( ता.खानापूर ) या गावी झाला.
आपल्या मणतुर्गा गावात भाजप पक्षाला बळकट करण्यासाठी त्यानी सिंहाचा वाटा उचलला आहे.
खानापूर तालुका माजी अध्यक्ष संजय कुबल यांच्या मार्गादर्शनाखाली कार्यकरत असताना त्यानी खानापूर तालुका भाजप सचीव म्हणून सेवा बजावली आहे.
भाजप पक्षाच्या कार्यासाठी अहोरात्र धडपडणारा कार्यकर्ता म्हणून गजानन पाटील यांच्याकडे पाहिले जाते .खानापूर तालुक्यात भाजपच्या कोणत्या कार्यात सदैव पुढे राहणारा कार्यकर्ता म्हणून त्याना ओळखले जाते.
तालुक्या बरोबर मणतुर्गा गावच्या बससेवे साठी सतत प्रयत्न करून गावच्या विद्यार्थ्याची ,नागरीकाची सोय करण्याची तळळमळ त्याची दांडगी आहे. मणतुर्गा परिसरातील समस्या सोडविण्यास त्याचा नेहमीच पुढाकार असतो. माजी आमदार व डीसीसी बॅक संचालक अरविंद पाटील यांच्या प्रयत्नाने मणतुर्गा गाावत कृषी पत्तीन सोसायटीची स्थापना करण्यास गजानन पाटील यानी कष्ट घेतले.
गर्लगुंजी जिल्हा पंचायत विभागात भाजपच्या बुथ कमिट्या मजबुत व वाढविण्यात त्यांचा हातखंडा आहे.
समाज सेेवेचे व्रत घेऊन सतत स्वताला कार्यात झोकून घेणारे भाजपचे युवा नेते गजानन पाटील याना आजच्या वाढदिवसा निमित्त लाख लाख शुभेच्छा!