#खानापूर भाजपच्यावतीने सत्कार!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच खानापूर तालुका भाजपचे जेष्ठ नेते प्रमोद कोचेरी यांची कर्नाटक राज्य भाजप कार्यकारीणी सदस्यपदी निवड करण्यात आली.त्याच्या या निवडीमुळे खानापूर तालुक्यातुन त्यांचे अभिनंदन करत आहेत.
गेली अनेक वर्षे खानापूर तालुका भाजप पक्षाच्या प्रगतीसाठी त्यानी कार्य केले आहे.,त्याच्या या कार्याची दखल घेत त्याची कर्नाटक राज्य भाजप कार्यकारीणी सदस्यपदी निवड करण्यात आली.
प्रमोद कोचेरी यानी यापूर्वी खानापूर तालुका भाजपचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.तर त्यानी बेळगाव जिल्हा भाजप पदाची हँट्रीक साधली आहे.या काळात त्यानी भाजप पक्षाची संघटना बळकट केली.त्यामुळेच खानापूर तालुक्याला दोन वेळा आमदारकी मिळाली.
एवढेच नव्हे तर विविध मंत्री, खासदार यांच्या सहकार्याने खानापूर तालुक्यात विविध योजना आणून खानापूर तालुक्याचा विकास साधला.
याची दखल घेत प्रमोद कोचेरीची कर्नाटक राज्य भाजप कार्यकाऱीणी सदस्य पदी निवड करण्यात आली.


