#दोन दिवस होणार उत्सव!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चापगाव ( ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा शतक महोत्सव उद्या बुधवारी दि.२५ व गुरूवारी दि. २६ फेब्रूवारी रोजी साजरा होत आहे.
दि.१ फेब्रूवारी १९२६ साली स्थापना झालेल्या चापगाव मराठी शाळेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाची सुरूवात बुधवारी दि.२५ रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिडीने होणार आहे.
त्यानंतर उदघाटन समारंभ सोहळा प.पू.चन्नबसव देवरू रूद्रस्वामी मठ अवरोळी यांच्या दिव्य सानिध्यात होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शतक महोत्सव समितीचे अध्यक्ष विलास धबाले असुन नुतनीकृत शाळा इमारतीचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालक मंत्री सतीश जारकिहोळी व आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते होणार आहे.प्रवेशव्दार उदघाटन माजी आमदार अरविंद पाटील यांच्याहस्ते तर ग्रंथदिडी उदघाटन माजी आमदार दिगंबर पाटील व माजी आमदार सौ.अंजली निॆबाळकर यांच्याहस्ते होणार आहे. ग्रंथदिंडी पुजन माजी आमदार मनोहर किणेकर व खानापूर तालुका ब्लाँक काॅग्रेस अध्यक्ष व वकील संघटना अधक्ष अँड.ईश्वर गाड़ी यांच्या हस्ते होणार आहे.संगणक कक्ष उदघाटन किरण ठाकुर सल्लागार संपादक दै.तरूण भारत यांच्याहस्ते होणार आहे.स्मार्ट क्लासरूमचे उदघाटन उद्योजक किसनराव बेळगावकर व निरंजन सरदेसाई यांच्याहस्ते होणार आहे. शामियानाचेे उद्घाटन खानापूर को.आँप चे चेअरमन व माजी जिल्हा पंचीयत सदस्य जोतिबा रेमाणी यांच्याहस्ते होणार आहे. शुध्द पाणी पुरवठा कुंभाचे उदघाटन गोपाळ देसाई व मधुसन भंडीरी यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी दीप प्रज्वलन डी डी पी आय श्रीमती लिलावती हिरेमठ,मारूती पाटील समिती नेते व विलास बेळगावकर,मुरलिधर पाटील ,जिल्हाध्यक्ष प्राथ.शिक्षक संघ जय कुमार हेबळी,उद्योजक मुकूंद पाटील, पायाप्पा चलवादी आदीच्याहस्ते होणार आहे.
शतपर्व स्मरणिकेचे प्रकाशन भाजप नेत्या सौ धनश्री सरदेसाई,एम.डी. सदानंद पाटील,उद्योजक पिटर डिसोझा, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते संजय कुबल,बीईओ पी रामाप्पा ,बाळासाहेब शेलार, आबासाहॆब दळवी, नामदेवदादा कुटवड,मल्लापा मारीहाळ,बसवराज नागलापूर यांच्याहस्ते होणार आहे.
गणेश पुजन माजी जि .प. सदस्य जयराम देसाई, नारायण कार्वेकर,सरस्वती विजन उद्योजक तानाजी पाटील,उद्योजक व्यंकटेश पाटील,म.जोतिबा फुले फोटो पूजन माजी जि.प.सदस्य बाबूराव देसाई, मुगूटसाब धारवा़डी,सावित्रीबाई फुले फोटो पुजन भाजप नेते विठ्ठल पाटील,समिती नेते प्रकाश चव्हाण, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर फोटो पुजन डी एम भोसले व गोपाल पाटील,म.गांधी फोटो पुजन भालचंद्र पाटील,नामदेव कदम,फोडेश्वर फोटो पुजन नारायण पाटील ,सूर्यकांत कुलकर्णी आदीच्याहस्ते होणार आहे.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दुसरे सत्र दुपारी २.३० ते ४ यावेळेत व्याख्यान असुन व्याख्याते गणेश शिंदे हे मातृभाषेचे महत्व व संस्काराची गरज याविषयावर बोलणार आहेत.यावेळी प्रमुख उपस्थिति म्हणून अभियंते नागेंद्र पाटील व तालुक्यातील पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
तिसरे सत्र सायं.७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम गितराधाई:उत्सवशाही !
यावेळी कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी माजी ग्रा पं अध्यक्ष रमेश धबाले उपस्थित राहणार आहेत.उदघाटन माजी आमदार अरविंद पाटील,तर दीप प्रज्वलन पी को पी एस चेअरमन उदय पाटील, संचालक अशोक पाटील,रूद्रापा घारशी,सागर कडबी,सिकंदर सनदी,भरमाणी जिवाई,गोविंद धबाले,शिवाजी मादार, शतकमहोत्सव कार्यदर्शी जयदेव आंबाजी,हणमंत पाटील,आदीच्याहस्ते होणार आहे.
या वेळी विविध देवदेवतांच्या फोटोचे पूजन कल्लापा पाटील, हणमंत पाटील,नारायण देसाई, मारुति कुकडोळकर,अनिल बेळगावकर,पांडुरंग पाटील,प्रभाकर पाटील, हभप दशरथ पाटील,अशोक धबाले, सुनील कदम, प्रल्हाद पाटील,भरमाणी पाटील आदीच्याहस्ते होणार आहे.यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन प्रा.शंकर गावडा हे हजर राहणार आहेत.
यावेऴी प्रमुख अतिथी म्हणून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गुरूवारी मा जी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा व सत्कार समारंभ!
गुरूवारी दि.२६ रोजी सकाळी १० वाजता माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा व सत्कार समारोह आयोजित करण्यात आला असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस डी एम सी अध्यक्ष मष्णू चोपडे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी दीपप्रज्वलन समाजिक कार्यकर्ते यशवंत बिर्जे,कर्नाटक शिवसेना राज्य उपाध्यक्ष के.पी.पाटील,धनंजय पाटील,पुन्नापा कुर्हाडे,पांडुरंग पाटील,
सोमलिंग धबााले ,केशव घार्शी,शतक महोत्सव समिती उपाध्यक्ष महादेव दळवी यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डाॅ.चंद्रकात पोत दार उपस्थित राहणार आहेत.तर
विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन महाबळेश्वर पाटील माजी ग्रा पं अध्यक्ष हलगा, उद्योजक सुरेश पाटील,चांगापा पाटील,सीताराम बेडरेे,श्रीमती मंगला जीवाई,श्रीमती रेणुका धबाले,परशराम पाटील,सुनिल गुरव,उद्योजक लक्ष्मण पाटील,मारुती साबळे, अनिल देसाई,कल्लापा कदम,भाजप नेते पंडित ओगले,प्रभाकर देसाई,परशराम मडवाळकर,लक्ष्मण पाटील आदीच्याहस्ते होणार आहे.
या वेळी प्रमुख अतिथि म्हणून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या वेळी माजी शिक्षकांचा सत्कार होणार आहे. तरी सर्वानी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शतक महोत्सव समितीने केले आहे.

