#अभ्यासाच्या दिवसात विद्यार्थी ही ग्राऊंडवर!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
दर वर्षी फेब्रुवारी, मार्च ,एप्रिल महिणा विद्यार्थ्याचे भविष्य ठरविणारे महिणे असतात.आणि याच मोक्यावर खानापूर शहरासह तालुक्यातील खेडोपाडी क्रिकेट चषकाना ऊत येतो.आणि याच वेळी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे विद्यार्थी परिक्षेच्याकाळात क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी ग्राऊंडवर तासानतास वेळ घालवत असतात.
खानापूर शहरात सुध्दा मलप्रभा क्रिडागणावर जवळ असलेल्या सरकारी माध्यमिक हायस्कूल, सरकारी पदवीपूर्व काॅलेज, इंग्लिश मिडीयम स्कूल, अशाअनेक हायस्कूलचे विद्यार्थी ऐन परिक्षेच्या तो़डावर क्रिकेट साठी तासानतास वेळ क्रिकेट ग्राऊंडवर काढत असतात.
तेव्हा अशा क्रिकेट स्पर्धा ऐन परिक्षेच्या तोंडावर भरवुन विद्यार्थ्याच्या अभ्यासाचे मोठ्या प्रमाणात न कळत नुकसान होते. विद्यार्थ्याची टक्केवारी कमी झाली की पालकाना मनस्ताप सहन करावा लागतो.
#यंदा तालुक्याचा १० वीचा निकाल ९५ टक्के लागण्याचा विश्वास !
खानापूर तालुक्यात दहावीचा निकाल लागण्यासाठी दर वर्षी तालुका शिक्षण खात्याकडे सातत्याने प्रयत्न केले जातात. आज तागायत खानापूर तालुका दहावी परिक्षेचा निकाल ८०. ते ८५ टक्क्याच्या पुढे गेलाच नाही. मात्र यंदा खानापूर तालुक्याचा दहावीचा निकाल. ९५ टक्क्यापर्यत लागण्याचा विश्वास खानापूर तालुका शिक्षण खात्याने वर्तविला.
मात्र दुसरीकडे खानापूर श हरा सह तालुक्यात क्रिकेट चषकाना ऐन परिक्षांच्या तोंडावर धुमाकूळ घात ला आहे.याचा परिणाम चालु असलेल्या क्रिकेट स्पर्धापासुन जवळ असलेल्या हायस्कूलच्या व पद वी पूर्व काॅलेजच्या विद्यार्थ्याच्या अभ्यासावर होत आहे.
परिक्षेचा काळ म्हणजे वर्षभर केलेल्या अभ्यासाचा निकाल असतो.आणि जर याच काळात क्रिकेट चषक स्पर्धा घेऊन विद्या र्थ्याच्या अभ्यासाचे वाटोळे होत असेल तर भविष्यात विद्यार्थ्यानी पुढे कसे जावे.
तेव्हा ऐन परिक्षेच्या तोडावर क्रिकेट चषक सारख्या स्पर्धानी वेळीच लक्ष द्यावे.आणि भविष्यात विद्यार्थ्याचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे.

