#अक्षता रोपण हजारोभक्तांच्या उपस्थितीत संपन्न!
बैलूर,बाकनूर,मोरब,देवाचीहट्टी गावची श्रीमहालक्ष्मी यात्रा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
भंडार्याची उधळण करत व उदोगे आई उदोच्या गुजरात मोठया उत्साहाने
सरदेसाई जांबोटीकर संस्थानिकांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या बैलूर , बाकनूर, मोरब व देवाचीहट्टी या चार गावातील १५ वर्षांनी आलेली श्री महालक्ष्मी देवीची यात्रा आज बुधवारी दि.,६ मे रोजी सकाळी साडे दहा वाजता अक्षतारोपण झाल्या.
जांबोटी संस्थान त्यानुसार आताचे सांस्थानिक श्रीमंत सरकार कर्णसिंह सरदेसाई जांबेटीकर व श्रीमंत राणीसरकार सौ. धनश्री कर्णसिंह सरदेसाई जांबोटीकर ह्या उभततांच्या हस्ते पहाटे पाच वाजता विधीवत धार्मिक कार्याला सुरुवात झाली.
यावेळी कार्यक्रमाला तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर सपत्नीक उपस्थित होते. माजी आमदार अरविंद पाटील,गावचे लक्ष्मण झांजरे,पुंडलिक नाकाडी,माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे, विलास बेळगांवकर, शिवाजी तुर्केवाडकर,तुकाराम बीरजे,प्रकाश मजगावी,पुडलिक पाटील, भैरू पाटील सह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
यावेळी यात्रोत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन गुरूवारी दि.१४ मे रोजी सायंकाळी महाआरती झाल्यानंतर देवीचे सीमेकडे प्रस्थान होईल, त्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे.
तरी यात्रेला सर्वानी मोठ्यासंख्येने उपस्थित राहुन यात्रेची शोभा वाढवावी.असे आवाहन श्रीमहालक्ष्मी यात्रोत्सव कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
