संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता.खानापूर ) येथील श्री महालक्ष्मी ग्रुपच्या एज्यूकेशन सोसायटी संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूल व विद्याभारती कर्नाटक बेळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्हास्तरीय गणित विज्ञान मेळावा उद्या शनिवारी दि ३० आँगष्ट रोजी सकाळी ९ वाजता शांतिनिकेत पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
यामेळाव्यात बेळगांव जिल्ह्यातुन एकूण ८ शाळेतील जवळपास २०० हुन अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या मेळाव्यात गणित, विज्ञान,वेदिक गणित,संस्कृत, याविषयावर विविध प्रयोग,माॅडेल,प्रश्न मंजुषा,संस्कृत पठण , प्रदर्शित करण्यात येतील.
मेळावा सकाळी११ ते दुपारी १ वाजेपर्यत सर्वासाठी हे प्रदर्शन खुले आहे.तरी सर्व विद्यार्थ्यानी ,पालकानी ,शिक्षकानी व इच्छुकानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.
