
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील वडगांव जांबोटी येथील १९९९ कारगील युध्दातील शहीद जवान धोंडीबा देसाई यांच्या स्मर्णात वडगाव (जांबोटी ) येथे प्रवेशव्दार उभारणी कार्यक्रम उद्या रविवारी दि.१३ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त जवान बळवंत इंगळे अध्यक्ष बांधकाम कमिटी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पहिला काॅलम पुजन आमदार विठ्ठल हलगेकर तर दुसरा काॅलम पुजन माजी आमदार अरविंद पाटील यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी दिपप्रज्वलन बाबूराव देसाई,सौ. धनश्री सरदेसाई राज्य कार्यकरणी सदस्या भाजपा महिला मोर्चा ,डाँ.सौ.सोनाली सरनोबत,भाजपा बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,जयराम देसाई, विलास बेळगावकर संस्थापक दि. जांबोटी को.आँप सोसायटी, आबासाहेब दळवी राष्ट्रपती पुरस्कृत आदर्श शिक्षक यांच्याहस्ते होणार आहे.
प्रमुख वक्ते म्हणून भाजप नेते संजय कुबल व शिक्षक अजित सावंत उपस्थित राहणार आहेत.
मान्यवरांच्या हस्ते विविध फोटोचे पुजन होणार आहे.देणगी पुस्तकाचे उदघाटन होणार आहे.
यावेळी शहिद धोंडीबा देसाई यांच्या आई वडीलांचा सत्कार होणार आहे.