
#प्रत्येकी ५० विद्यार्थ्याना प्रवेश!
#आम.विठ्ठल हलगेकरानी दिली पत्रकार परिषदेत दिली माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता.खानापूर) येथील श्रीमहालक्ष्मी ग्रुप एज्यूकेशन सोसायटी संचालित शांतिनिकेत पी.यू.काॅलेजमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात बीसीए व बीबीए शिक्षणाच्या कोर्सला प्रारंभ करण्यात येणार आहे. बीसीए साठी५० विद्यार्थी तर बीबीए साठी ५० विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येणार आहे. तरी प्रवेश देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. अशी माहिती आमदार व श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर यांनी गुरूवारी शांतिनिकेतन मध्ये बोलविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले की मी आमदार असल्याने खानापूर तालुक्यातील अनेक विद्यार्था बीसीए अथवा बीबीए काॅलेजमध्ये प्रवेशासाठी शिफारस पत्र घेऊण जातात.तरी प्रवेश मिळत नाही.ही आडचण घेऊन लक्षात शांतिनिकेतन पी.यू काॅलेजमध्ये बीसीए व बीबीए शिक्षणाची सोय यावर्षीपासुन करण्यात येत आहे.तेव्हा विद्यार्थ्यानी प्रवेश घ्यावा.असे आवाहन केले.
यावेळी शांतिकेतन पी.यू.काॅलेजचे चेअरमन प्रा.बंडू मजूकर म्हणाले की खानापूर हे निर्सग दृष्ट्या अति उत्तम तालुक्याचे ठिकाण आहे. तालुक्यातील विद्यार्थ्याना बाहेरच्या काॅलेजला जाण्यासाठी चार,चार तास वेळ वाया जातो. बस प्रवास सोयीचा नाही. विद्यार्थ्याची गैर सोय लक्षात घेऊन आम्ही बीसीए व बीबीए शिक्षणाची सोय केली आहे.
यावेळी सचीव प्रा.आर एस पाटील म्हणाले की, बीसीए व बीबीए पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी श्रीमहालक्ष्मी ग्रुप नोकरीची संधी देण्यास उत्सुक असुन उद्यमबाग याठिकाणी नोकरीची संधी मिळते.एवढेच नव्हे तर देशातील कंपण्यामध्ये ही बीसीए ,बीबीए पदवीधराना नोकरीची संधी मिळते.खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे.असे सांगीतले.
यावेळी पीआरओ सौ.हमनाज .ए.खानापूरी यानी याबद्दल माहिती दिली.