
खानापूर तालुका म ए समितीचे शिवस्मारकात आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
मणतुर्गा (ता.खानापूर ) गावचे सुपूत्र व मणतुर्गा सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक याना यंदाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
यानिमित्त खानापूर तालूका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक ,तालुका आदर्श शिक्षक व तालुका आदर्श शाळा आदीचा सत्कार सोहळ रविवारी दि १५ रोजी येथील शिवस्मारक सभागृहात पार पडला. यावेळी मणतुर्गा शाळेचे शिक्षक व गावचे सुपूत्र एम एम देवकरी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका म ए समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते.
व्यासपीठावर माजी आमदार म ए समितीचे कार्या अध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे ,शंकर पाटील निडगल, मारूती परमेकर,उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत आबासाहेब दळवी यानी केले.तर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले एम एम देवकरी यांचा शाल ,पुष्पहार, श्रीफळ व मानचिन्ह देऊन माजी आमदार व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना एम एम देवकरी यानी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी खानापूर तालुका म ए समितीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते, शिक्षक व नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचीव आबासाहेब दळवी यानी केले. तर आभार नंदगड विभाग कार्याध्यक्ष रमेश धबाले यानी मानले.