
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
मराठा मंडळ संस्थेच्या खानापूर येथील ताराराणी व मराठा मंडळ हायस्कूलच्या मुलीच्या हाॅकी संघाने कर्नाटक राज्यपातळीवरील माध्यमिक विभागाच्या हाॅकी स्पर्धेत तृतीय क्रमांकासह ब्रांझ मेडल पटकाविला.
त्या खेळांडुचे खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी खानापूर बसस्थानकावर आगमन होताच गुलाब पुष्प देऊन मुलीच्या हाॅकी संघाचे अभिनंदन केले.
यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी बोलताना म्हणाले की माजी आमदार डाॅ.अंजलीताई निंबाळकर यानी राष्ट्रीय व राज्यपातळीवरील कबड्डी सारखे खेळ खानापूर तालुका पातळीवर भरवुन खेळांडुच्या कलागुणाना व्यासपीठ मिळवुन दिले असे सांगीतले . ऐवढेच नवहेतर काॅग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही अँड .ईश्वर घाडी यानी दिली.
यावेळी अँड.प्रकाश बाळेकुंद्री विजय रजपूत,गणपत गावडे , विनायक मुतगेकर व इतर काॅग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.