
#दोने खेळांडूची राज्य स्पर्धेसाठी निवड!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या खानापूर शहरातील श्रीसिध्दिविनायक इंग्रजी शाळेच्या खेळांडुनी बेळगांव येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले आहे.
विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे: दिनेश पाटील६०० मीटर धावणे व्दितीय ,माधव धबाले४०० मीटर धावणे व्दितीय,कृतिका चौगुले १०० मीटर धावणे तृतीय,अस्मिया देसाई कराटे तृतीय,श्रेयस पाटील विमन टोनी स्केटींग तृतीय,प्रताप सपलिंगा कुस्ती प्रथम,अजय पाटील १०० मीटर धावणे प्रथम,४०० मीटर धावणे तृतीय क्रमाक मिळविला आहे.
तर प्रताप सपलिंगा व अजय पाटील यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजयी खेळांडुना क्रिडाशिक्षक उमेश यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
तर संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू तसेच संचालक शिवाजी पाटील ,परशराम गुरव व मुख्याध्यापिका वैभवी वंजारे ज्योति हेब्बाळकर याचे सहकार्य लाभत असुन त्याच्याकडुन अभिनंदन होत आहे.