#माचाळी ,सातनाळी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य!
#कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा धणक्का!
संदेश क्रांंती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी :
खानापूर तालुक्यात आमदार फंडातुन पाच लाख निधीतुन मोहीशेत ग्राम पंचायत हद्दीतील रामनगर टोलनाक्यापासुन माचाळी , पिंपळे ,माजंर पै,ते सातनाळी या ६ ते ७ किलो मीटर अंतराचा रस्ता मेटलिंग करून डांबरीकरण करण्यासाठी निधी मंजुर करून रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र कंत्राटदाराच्या हलगर्जीपणा मुळे केवळ रस्त्यावर खडी टाकून मोरम टाकण्यात आल्याने पावसाच्या सुरूवातीलाच या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
गुडघाभर चिखलातुन गावकर्याना पायपीट करताना त्रास सहन करावा लागत आहे.
कंत्राटदाराने उत्कृष्ट दर्जाचे काम करणे गरजेचे!
रस्त्याचे काम मिळताच कंत्राटदार कामाचा दर्जा लक्षात घेत नाहीत. पैशाच्या मागे लागुन निकृष्ट दर्जाचे काम करून जाऊन सोडतात.याचा त्रास स्थानिक नागरीकाना सहन करावा लागतो.याचे उदाहरण म्हणजे माचाळी ,पिंपळे,मांजर पै,ते साताणाळी रस्ता होय.
आज पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. आणि रस्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आता संपूर्ण पावसाळ्यात यारस्त्यावरून येजा करणे नागरीकाना त्रासाचे होणार आहे.
तेव्हा कंत्राटदाराने या रस्त्याची दखल घेऊन पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.
तेव्हा सबंधीत खात्याच्या अधिकार्यानी तसेच आमदारानी या रस्त्याची पाहाणी करावी. व कंत्राटदाराची कान उघडणी करावी.आशी मागणी स्थानिक नागरीकांतुन होताना दिसत आहे.
कंत्राटदारानी रस्त्याचे काम करताना कामाचा दर्जा चांगला राखावा. जेने करून स्थानिक नागरीकाना याचा त्रास होऊ नये.
भाजप नेते बाबासाहेब देसाई.