
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
मौजे किरहलशी ( ता. खानापूर ) येथे श्रीमंत ब्रम्ह सदगुरू वैकुंठवाशी विवेकानंद दादा आप्पासाहेब वासकर महाराज ,नानासाहेब तात्यासाहेब वासकर व श्री गुरू गोपाळअण्णा वासकर महाराज पंढरपूर यांच्या कृपाशिवादाने व हभप सातेरी गोपाळ शिवठणकर व हभप शटवापा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे यंदा रविवार दि १७ रोजी ६१ वा पुण्यस्मरण सोहळा ” वै. गणेश भैरू गावडा व वै. तुकाराम गणेश पाटील याची पुण्य स्मरण सोहळा व तुळशी विवाह सोहळा व महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाला.
प्रारंभी रविवारी सकाळी ८वाजता पोती स्थापना हभप पांडुरंग महाराज घोटगाळी ,हभप कृष्णाजी पाटील यांच्याहस्ते होऊन सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वरी पारायण (९,१२ वा) अध्यायनाचे वाचन झाले. यावेळी हभप मुख्याध्यापक सदानंद पाटील यानी उपस्थित वारकर्याचे पादपुजन करून कार्यक्रमाला सुरूवात केली.
त्यानंतर भाविकाना दुपारी १ ते २ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले .यावेळी भाविकानी महाप्रसादाचा स्वाद घेतला.
दुपारी गाथा भजन,प्रवचन ,नामजप,व किर्तन आदी कार्यक्रम !
दुपारी २ ते ३ : गाथा भजन ,लक्ष्मण पाटील करजगी,व्यंकट मेरवी,अशोक शिगीहाळी,मष्णू जोशिलकर,वसंत सुतार,तुकाराम पाटील,म्हात्रू वांद्रे,व वारकरी यांच्या उपस्थितीत पार पडला.
तसेच दुपारी ३ ते ४ प्रवचन यावेळे नामजप: हभप रामू कोलेकर मलवाड,हभप विठोबा सावंत निलावडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
त्यानंतर सायंकाळी ४.३० ते ६ यावेळत किर्तन हभप विठ्ठल पाटील युवाकिर्तनकार किरहलशी याचे किर्तन पार पडले.
# तुळशी विवाह संपन्न!
रविवारी सायंकाळी ६ वाजता हभप.मुख्याध्यापक सदानंद पाटील याघरी तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात आले.
त्यानंतर ७ ते ९ हनुमान संगीत भजन मंडळ व वारकरी मंडळ मोदेकोप यांचे भजन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी हभप मुख्याध्यापक सदानंद पाटील , ग्राम पंचायत सदस्य सौ. स्वाती पाटील,अभियंते दिगंबर पाटील,व डाॅ. कृष्णाजी पाटील यानी उपस्थित वारकरी, भाविक मंडळीचे आभार मानले.