#कार्यक्रमात वयोवृद्धाचा सत्कार करणार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
दि संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाच्या वतीने खानापूर तालुका पातळीवर रविवार (दि.१९) एप्रिल रोजी शिवस्मारकात दुपारी 3 वाजता संत गोरा कुंभार पुण्यतिथी करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुक्यातील ११ गावातील ७० वर्षे वय ओलांडलेल्या नागरिकांना कुंभारत्न प्रमाणपत्र देऊन गौरवण्याचा एकमुखी निर्णय डुक्करवाडी येथे रविवार (दि.12) रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरु कुंभार होते. बैठकीच्या प्रारंभी सचीव परशराम पालकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ठ केला. बैठकीत दि. १५ एप्रिल रोजी संत गोरा कुंभार यांची पुण्यतिथी आहे. ती प्रत्येक गावपातळीवर साजरी केली जाते. तालुकापातळीवर संत गोरा कुंभार पुण्यतिथी साजरी करण्यासाठी रविवार (दि.१९) रोजी तारीख निश्चित केली आहे. बेळगाव व खानापूर तालुक्यातील कुंभार समाजातील वयोवृद्ध नागरिकांना कुंभरत्न प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सायंकाळी अल्पोपहार व तीर्थप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
बैठकीला उपाध्यक्ष सोमनाथ कुंभार, खजिनदार नागाप्पा उत्तुरकर, सदस्य यशवंत पालकर, समन्वयक एम. टी. कुंभार, अमर कुंभार, रमेश कुंभार उपस्थित होते.
