#भाविकांची अलोट गर्दी!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
कदंबकालीन ऐतिहासिक उपराजधानी म्हणून ओळखणार्या हलशी,हलशीवाडी (ता.खानापूर) गावच्या ग्रामदैवता लक्ष्मी यात्रा तब्बल २८ वर्षानी बुधवारी दि.८ रोजी पहाटे सुर्योदयाच्या वेळी ६ वाजुन २३ मिनीटानी अक्षतारोपणानी प्रारंभ झाला.यावेळी भाविकानी भंडार्याची उधळण करत व उदो ग आई उदोच्या गजरात व अत्यंत आनंदात ,भक्तीभावाने सुरूवात झाली.
हलशी,हलशीवाडी गावात लक्ष्मी यात्रेचा उत्साह संचारला होता.देवीचे दर्शन देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
यात्रेनिमित्त महालक्ष्मी देवीची विशेष पुजा आर्चा, करण्यात आली.तर भाविकानी भक्तीभावाने देवीचे दर्शन घेतले.यावेळी कर्नाटक ,गोवा, महाराष्ट्र राज्यातील अनेक भागातील भाविक मोठया संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
लक्ष्मीयात्रा उत्सवाला आजी , माजी लोकप्रतिनिधीसह अनेक मान्यवर उपस्थित राहुन देवीचे दर्शन घेतले.
हलशी गाव भाविकानी फुलून गेले होते.
बुधवारी दि.८ ते गुरूवारी दि १६ एप्रिल पर्यत यात्रा!
बुधवारी दि .८ रोजी पहाटे सुर्योदयाला ६वाजुन २३ मिनीटानी अक्षतारोपण होऊन यात्रेला प्रारंभ झाला.
गुरूवारी दि.९ रोजी दुपारी २ वाजता श्रीमहालक्ष्मी देवी रथावर विराजमान. होऊन रथोत्सवाला सुरूवात होऊन सायंकाळी ६ वाजता महालक्ष्मी गदगेवर स्थानापन्न होऊन यात्रेला सुरूवात होणार , यात्रेच्या ९ दिवसाच्या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन आले आहेत.
