#कणकुंबी माऊली मंदिरपासुन चिगुळे गावापर्यतच्या ३ किलोमीटर रस्ता रखडला!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अतिजंगलाने व्यापलेला तालुका म्हणून परिचित आहे.त्यामुळे जंगलभागात येणार्या रस्त्याच्या कामाला वनखात्याचा कायम विरोध असतो. त्यामुळे गेल्या सहा महिण्यापासुन कणकुंबी माऊली मंदिरपासुन ते चिगुळे गावापर्यतच्या ३ किलो मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अद्याप रखडले गेले आहे. त्यामुळे याभागातील नागरीकांना अर्धवट रस्त्याच्या कामामुळे प्रवास करणे कठीण झाले आहे.
याबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यानी वनखात्याला जाब विचारून होणारी आडचण दुर करावी.अशी मागणी नागरीकातुन होत आहे.
जंगलभागातील गावे स्थलांतरीत करण्याची दास्तीने नागरीकात भिती!
खानापूर तालुक्याच्या जंगलभागातील गावाचे स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात याभागातील विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्ते, ग्राम पंचायतीची विकास कामे होने कठीण होत आहे.
याभितीने पारवाड,चिगुळे ,सडा,मान , हुळंद गावातील नागरिक कामाच्या निमित्ताने गोवा राज्यात जात आहेत. जर कर्नाटक सरकारने खानापूर तालुक्याच्या जंगल भागातील गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष करत राहिले गावातील नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार.
तर दुसरीकडे जंगलातील गावे स्थलांतरीत व्हावीत, म्हणून जाणीव पूर्वक विकासाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे म्हणने याभागातील नागरीकांचे आहे.
तेव्हा लोकप्रतिनिधीनी चिगुळे रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर करावे. अशी मागणी याभागातील नागरीकातुन होत आहे.
#गेल्या ६ महिण्यापासुन रस्त्याचे काम अर्धवट!
चिगुळे गावाला जाणार्या रस्त्याचे काम कणकुंबी माऊली मंदिर पासुन ३ किलो मीटर अंतराचे काम गेल्या ६ महिण्यापासुन वनखात्याने
आडवून ठेवले आहे.त्यामुळे या रस्त्यावर चिगुळे गावच्या नागरीकांना ये जा करताना खूप त्रास सहनकरावा लागत आहे.तेव्हा आमदार विठ्ठल हलगेकर यानी वनखात्याला चांगलाच समज देऊन रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करावे.
माजी सैनिक गणपत गावडे.
