#सोमवारी महाप्रसादाचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर प्रतिनिधी
बांदॆकरवाडा ( ता.खानापूर ) ये थे सालाबाद प्रमाणे यंदाही श्री पांडुरंग अखंड नाम सप्ताहाला शनिवारी दि.१४ रोजी उत्साहात प्रारंभ झाला.
प्रारंभी शनिवारी सकाळी ११ वाजता पोथी स्थापना होऊन पांडुरंग अखंड नाम सप्ताहाला सुरूवात झाली.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण बांदेकर होते. कार्यक्रमाला हभप विठोबा सावंत , सामाजिक कार्यकर्ते यशवंत बीर्जे, समिति ने ते निरंजन सरदेसाई ,ग्राम पंचायत सदस्य व ट्रिब्यूनल मेबर विनायक मुतगेकर,ग्राम पंचायत चेअरमन. अरूण गावडे, श्रीकांत चिखलकर,राजू धूरी, आंबेडकर संघटना अध्यक्ष अर्जुन कांबळे,काॅट्रक्टर विष्णु बेळगावकर,नारायण दलवी,हभप राजराम शास्त्री, नकुल बांदेकर,सोमाणा शास्त्री,कृष्णा चिखलकर,पुंडलिक सावंत, तुकाराम दळवी,तसेच ग्राम पंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्यांहस्ते दिपप्रजेवलन व विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन करण्यात आले.
यावेळी हभप विनोबा सावंत यानी संताचा मार्ग कसा सुखकर असतो.याचे उदाहरण देऊन स्पष्ट केले.
यावेळी बोलताना ग्राम पंचायत सदस्य यानी याभागात शेतकर्याच्या समस्या पावला, पाव ला वर आहेत.गेल्या वर्षभरापासुन हत्तीनी शेतकर्याच्या ऊस पिकाबरोबर इतर पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.हे अद्याप थांबले नाही.असे अस ता ना आमदानी आपल्या साखर कारखान्याला निलावडे भागातील उस गळीत हंगामाच्या सुरूवातीपासुन उचलायला पाहिजे.कारण तोपिनकट्टी ,बिदरभावी, देवलती याभागातील उसाचे नुकसान हत्ती करत नाही.जंगली प्राणी करत नाही.याभागातील उसात डास सुध्दा जात नाही.अशा भागातील ऊस पहिला उचलतात, तर निलावडे भागातील हत्तीनी नुकसान करून झाल्यानंतर उचलतात.या ला काय म्हणायचे,हा भाग अति मागासलेला आहे.या भागात रस्त्याचा वन वा आहे.बसेसची सोय नाही.वीजपुरवठ्याचा नेहमीच लपंडाव सुरू असतो.तरी याभागाकडे दुर्लक्ष होते.आम्ही ग्राम पंचायती च्या माध्यमातुन आमच्या ताकदीनुसार जेवढा विकास करतो तेवढाच विकास निलावडे भागात झालेला आहे,ही खंत याभागातील जनतेला लागुन रा हि ली आहे.आम दा रानी याभागातील समस्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.असे मत प्रगट केले.
ग्राम पंचायत चेअरमन अरूण गावडे म्हणाले आमचा भाग मा गा ले ला आहे.याकडे कुणाचेच लक्ष नाही.केवळ ग्राम पंचायती कडुन जो निधी मिळेल त्यातुन याभागातील गावचा विकास करण्यात आला आहे.आमदारानी याभागाच्या समस्या जवळून पाहणे गरजेचे आहे.पण त्याकडे दुर्लक्ष होतआहे.
या वेळी यशवंत बिरजे , निरंजन सरदेसाई यानी याभागातील नागरीकाबद्दल तळमळतेने होत असलेल्या त्रासाचे समस्यांचे सविस्तर माहिती सांगीतली.याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगीतले, अर्जुन कांबळे यानी निलावडे भागाचा विकास केवळ दुर्लक्ष केल्याने होत नाही.असे सांगीतले.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार नागेश बांदेकर यानी मानले.
