#आंबा,काजु झाडांच्या मोहराला पोषक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
माडीगुंजी ( ता. खानापूर ) परिसरात मंगळवारी दि. २४ रोजी सायंकाळी अवकळी पावसाने हजेरी लावल्याने वीट व्यवसायीकातुन एकच धावपळ सुरू झाली.
मंगळवारी सकाळपासुन हवेत उष्णता वाढली होती.दुपार पर्यत अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन सायंकाळी अवकळी पाव सा ने हजारी लावली.त्यामुळे वाट उत्पादकातुन एकच धावपळ सुरू झाली.
सध्या माडीगुंजी परिसरात वीट व्यवसायाल जोर आला असुन वीट उत्पादक वाट तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत.
अनेक वीट उत्पादकानी लाखो कच्च्या वीटा तयार केल्या आहेत.तर काही वीट उत्पादकानी वीट भट्ट्या भाजुन माल तयार केला आहेे.
कच्च्या वीटा असलेल्या वीट उत्पादकाना मात्र अवकळी पावसाचा त्रास सहन करावा लागला.
कच्च्या वीटा भिजू नये यासाठी पावसाचे थेंब येताच कच्च्या वीटावर प्लॅस्टीक कापड घालुन आबादान करता ना बरीच धडपड उडाली.अवकळी पावसाने कच्च्यावीटा पाण्यात सापडु नये. यापावसाचे पाणी बाजुला काढताना बराच त्रास सहन करावा लागला.
बराच वेळ अवकळी पावसामुळे कच्च्या वीटा पाण्यात राहिल्या.त्यामुळे कच्च्या वीटा कोसळुन पडल्या.त्यामुळे वाट उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले.
अवकळी पाऊस आंबा,काजू मोहराला पोषक!
अवकळी पावसामुळे यंदा भरघोस आंबा, काजू झाडाना आलेल्या मोहराला पोषक आहे.कारण गेल्या काही दिवसात धुक्के पडले होते.त्यामुळे मोहर जळुन गेला होता.आता अवकळी पाऊस पडल्याने जळालेला मोहर धुऊन गेला .त्यामुळे पुढे फळ धारणा होण्यास चांगले वातावरण निर्माण झाले.
मात्र वीट उत्पाद काचे मात्र नुकसान झाले.

