संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात यंदा होणार्या जिल्हा पंचायत , तालुका पंचायत व ग्राम पंचायत निवडणुकावर खानापूर तालुक्यातील भीमगड अरण्याच्या हद्दीत येणार्या देगाव, गवाळी,कोगळा,पास्टोली , जामगाव
,हेम्माडगा , पाली, मेढील,कृष्णापूर, होळदा, आदी गावच्या नागरीकानी बहिष्कार घालुन आमचे म्हणने सांगण्यासाठी हा एकच पर्याय असेल असे मत समाज सेवक आनंद गावडे यानी बोलताना सांगीतले,
समाज सेवक व देगावचे नागरिक आनंद गावडे म्हणाले कि ,आज पर्यत मतदान करून कुणी समस्या सोडविल्या नाही.तेव्हा मतदान न करता राहु त्यानंतर सरकारचे डोळे उघडतील आणि या खेड्यातील किती समस्या पडुन आहेत.याची जाणीव होईल.
ऐन निवडणुक काळात उमेदवार घराघरापर्यत येतात.गोड बोलुन मत मागुन घेतात, निवडुन आल्या की पाठ फिरवतात.परत फिरून कोणी ही बघत नाही. एक रूपयाचा निधी देत नाही. तेव्हा येत्या सर्व निवडणुकावर भीमगड अरण्याच्या खेड्यातील नागरीकानी मतदान न करता बहिष्कार घालुन आपले मत मांडू.
याभागातील रस्ते, पुल , वीजपुरवठा, पाणी,शाळा,या समस्या आदी सोडवा, नंतर मताची मागणी करा.असे आवर्जुन सागुया.
येत्या होळीच्या सनात प्रत्येक खेड्यात नाट्य प्रयोग होतात. त्यावेळी नाटकाच्या व्यासपिठावर नेते मंडऴी येतात.केवळ भाषणबाजी करतात. आणि निघुन जातात.परत कोणी याभागातील समस्या कडे फिरकुण बघत नाही.
तेव्हा येत्या निवडणुकीत आपण मतदान न करण्याचा निर्णय घेऊ.
स्थलांतर बाबत नागरीकातुन नाराजी!
भीमगड अभयारण्यातील अनेक खेड्यांतील नागरीकातुन स्थलांतर बाबत नाराजी दिसुन येत आहे.सरकार ने १५ लाख रूपये निधी देण्यापेक्षा आमच्या समस्या रस्ते , वीजपुरवठा,बसवाहतुक ,शिक्षण आदी समस्या सोडवा. आम्हाला स्थरातंराचा प्रश्नच येत नाही. तेव्हा लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्तेआनंद गावडे यानी बोलुन दाखविली.
सोमवारी दि. १६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्याची तळेवाडी गावाला भेट देणार आहेत.
