#संगरगाळीत कार्डधारकाना घरपोच रेशन देण्यास प्रारंभ!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गेल्या काही दिवसा पूर्वी खानापूर तालुक्यातील ७५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरीकांना तसेच दिव्यांग कार्डधारकाना सरकारच्या आदेशानुसार रेशनदुकानदारानी वृध्द व दिव्यांग लोकाना घरपोच धान्य देण्यात यावे.आशा मागणीचे निवेदन खानापूर कदंबा सोशल फाऊंडेशनच्यावतीने जिल्हाधिकार्याना देण्यात आले होते.
याची दखल घेऊन जिल्हाधिकार्यानी खानापूर तालुका नागरी अन्नपुरवठा खात्याच्या अधिकार्याना घरपोच धान्य पुरवठा करण्याचे आदेश दिले होते.
लागलीच याची अंमलबजावणी करत खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रेशनदुकानदार वृध्द व दिव्यांगाना रेशन दुकानाव्दारे पुरवण्यात येणारा धान्यसाठा घरपोच देत नसल्याने त्याना सरकारच्या योजनेपासुन वंचित रहात होते. वृध्द आणि दिव्यांग कार्डधारकाना ठसा आणि मोबाईल मेसेज प्रक्रिया पूर्ण कठिण जात होते.आता यापुढे वृध्द व अपंग कार्डधारकाना कोणताही बॉयोमेट्रिक अथवा एसएमएसची अवश्यकता नसताना थेट धान्य पुरवण्यात येणार आहे.तशा प्रकाऱचे आदेश नागरी अन्नपुरवठा खात्याचे अधिकारी खातेदार यानी तालुक्यातील सर्व रेशन दुकानदाराना दिले आहे.त्यामुळे दिव्यांग व वृध्द कार्डधारकाची चांगली सोय होणार असल्याने खानापूर तालुक्यातील दिव्यांग व वृध्द नागरीकांतुन समाधान पसरले आहे.
संगरगाळीत धान्यसाठ्याचे वितरण करताना खानापूर कदंबा सोशल फाउंडेशन संस्थापक जाॅर्डन गोन्साल्विस,सदस्य एम जी कुमार,कारू लिमा, फादर बेंन्टो फ्रानाडिस,मायकेल फ्रनाडिस ,अँड.आकाश अथणीकर आदी उपस्थित होते.
