
#एआयसीसी सचिव अभिषेक दत्त यांची खानापूर ब्लॉक कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा!
#पहलगम येथे दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
एआईसीसी सचिव अभिषेक दत्ता तसेच बे़ळगांव कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष विनय नवलकट्टी याच्या उपस्थितीत गुरूवारी दि.२४ रोजी सकाळी ११ च्या सुमारास रायगड निवासी खानापूर येथे क्राॅग्रेसची बैठक पार पडली.
यावेळी बैठकीत ब्लॉक कॉंग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून
यावे़ळी सोमवारी दि २८ रोजी सकाळी ११ बेळगांव येथील आंदोलनात हजारो लोकांना घेऊन मोदी सरकारच्या महागाई विरुद्ध च्या लढ्यात खानापूर कॉंग्रेस सहभागी होणार असे एआयसीसी सचिव दत्त यांना सांगितले.
यावे़ळी तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी, महादेव कोळी, काॅग्रेस नेते सुरेश जाधव, ट्र्ब्यूनल संचालक विनायक मुतगेकर,नगरसेवक लक्ष्मण मादार, तोहीद चादखन्नावर, सावित्री मादार, वैष्णवी पाटील,सर्व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.