
#तनुजा लाड राणी चन्नमा विद्यापिठला चौथा रँक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
खानापूर तालुका अति मागासलेला तालुका अशा तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करून खानापूर येथील केएलई बीसीए च्या ५८ विद्यार्थ्याना विविध कंपण्यामध्ये नोकरीची सुवर्ण संधी मिळाल्या बद्दल खानापूर केएलई बीसए काॅलेजचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
बेळगांव जिल्हात प्रथम एकाचवेळी खानापूर केएलईच्या ५८ बीसीएच्या विद्यार्थ्याना नोकरीची संधी दिली.त्यांचे कौतुक करताना सर्वानाच आनंद होत आहे.
असे विचार लोकमान्य संस्थेच्या वागळे काॅलेजच्या प्राचार्या शरयू कदम यानी बुधवारी काॅलेजच्या सभागृहात सत्कार समारंभाच्यावेळी प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीसीए काॅलेजचे प्राचार्य आनंद तावशी होते.
व्यासपिठावर प्राचार्या शरयू कदम, केएलई होसमनी सायन्स काॅलेजचे प्राचाार्य विजय कलमठ,प्रा. तेजस्विनी पाटील आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक कु.आरकांज फर्नांडीस हीने केले.
उपस्थितांचे स्वागत प्राचार्य आनंद तावशी यानी पुष्पगुच्छ देऊन केले.
यावेळी काॅलेजची विद्यार्थीनी तनुजा लाड ही राणी चन्नमा विद्यापीठला चौथा रॅक मिळविल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
तसेच बीसीए काॅलजच्या ६० पैकी ५८ विद्यार्थ्याना विविध कंपण्यामध्ये नोकरीची संधी मिळाल्याबद्दल त्या विद्यार्थ्याचा प्रमाण पत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्राचार्य आनंद तावशी व विजय कलमठ यानी मार्गदर्शन केले.पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊ केल्या.
यावेळी विद्यार्थ्यानी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार ही केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.आरकांज फर्नांडीस हिने केले.तर आभार प्रा.गायत्री यानी मानले.