
#आम.विठ्ठल हलगेकर,नगराध्यक्षा सौ.मिनाक्षी बैलूरकर व अन्य मान्यवरांच्याहस्ते कुदळ मारून प्रारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातुन खानापूर शहरातील शिवस्मारक चौक ते ज्ञानेश्वर मंदिरापर्यतच्या रस्त्याच्या कामासाठी ३२लाख ८० हजार रूपये अनुदान मंजुर करून सोमवारी दि २१ रोजी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी खानापूर नगरपंचायतीचे अभियंते तिरूपती राठोड यानी प्रास्ताविक केले.
तर चीफ आँफिसर संतोष कुरबेट यानी पुष्पगुच्छ देऊन आमदार विठ्ठल हलगेकर व उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की,शहराचे सौंदर्य वाढवायचे असेलतर प्रथम उत्तम रस्ते ,गटारी झालीच पाहिजे यासाठी सरकारच्या १५ व्या वित्त अयोगातुन ३२लाख ८० हजार रूपयाचे अनुदान मंजुर होऊन कामाचा शुभारंभि करण्यात आला.उर्वरीत रेल्वेस्टेशन ते शिवस्मारक चौकापर्यतचा रस्त्याचे ही पी.डब्लूडी खात्याच्या अनुदानातुन मंजुर करून लवकरच यारस्त्याचे काम करण्यात येेणार आहे.
याजबरोबर मराठा मंडळ डीग्री काॅलेज ते करंबळ क्राॅस पर्यतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.अशी माहिती यावेळी दिली.
यावेळी कार्यक्रमाला खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. मिनाक्षी प्रकाश बैलूरकर ,.उपनगराध्यक्षा जया भुतकी व नगरसेवक लक्ष्मण मादार,प्रकाश बैलुरकर,नारायण ओगले,मजहर खानापूरी ,रफिक वारेमनी ,आप्पया कोडोळी,नगरसेविका मेघा कुंदरगी,राजश्री तोपिनकट्टी,लता पाटील तसेच भाजपा माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल,भाजप नेते मल्लापा मारीहाळ,लैला साखर कारखाण्याचे एम डी सदानंद पाटील, गुंडू तोपिनकट्टी, राजेद्र रायका,व भाजपचे नेते तसेच समितीचे नेते प्रकाश चव्हाण व तसेच अभियंते तिरूपती राठोड, श्री कांबळे ,प्रेमानंद नाईक, राजू जांबोटी व इतर कर्मचारी आदी उपस्थित होते. आभार विनोद संनदी यानी मानले.