#विविध कार्यक्रमाचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
लोंढा ( ता.खानापूर ) येथील सिध्दिविनायक मंदिरात सालाबाद प्रमाणे यंदा ही आज मंगळवार पासुन ते गुरूवारी दि २२ पर्यत श्री गणेश जयंती निमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सकाळी श्री च्या मुर्तीला अभिषेक दुपारी ११ वा जता श्री सिध्दीविनायकांची पालखीतुन मिरवणुक,उद्या बुधवारी दि.२१ रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक,सकाळी १०. ३० गणहोम, तर सायंकाळी शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
गुरूवारी दि. २२ रोजी सकाळी अभिषेक दुपारी १२ वाजता गणेश जन्मोत्सव ,दुपारी १ . ३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी श्री फळांचा सवाल,तर रात्री ९ वाजता “सार काही गुपचुप” हा नाट्य प्रयोग होणार आहे.
तरी भाविकानी कार्यक्रमाला व प्रसादाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

