#वकील संघटनेचे अध्यक्ष अँड ईश्वर घाडी सह वकीलानी व कमत्राटदारानी केली पाहणी,!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरांतर्गत शिवस्मारक चौक ते हलकर्णी क्राॅस पर्यतच्या रस्त्याच्या सर्वेक्षण करून अरेखन व अतिक्रमण हटाव करून , शहरांतर्गत महामार्गाचा रूंध्दीचा मार्ग मोकळा केला हे प्रकरण ताजे असतानाच खानापूर शहरात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या २० कोटी रूपये निधीच्या सरकारी दवाखाण्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे प्रकरण खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड ईश्वर घाडी व त्याच्या सहकार्यानी तसेच कमत्राटदार व समाज सेवेकानी सरकारी दवाखाण्याच्या इमारतीबांधकावर धडक भेट देऊन पाहणी केली.
या वेळी पी एल डी बॅकेचे चेअरमन व काॅन्ट्रक्टर मुरलीधर पाटील म्हणाले की, खानापूर शहरातील सरकारी दवाखाण्याच्या बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे आहे.असे ठामपणे सांगीतले.सरकारी दवाखाण्याच्या इमारतीच्या बांधकामाच्या फाऊडेशनमध्ये बेड क्राॅक्रीट न टाकता चक्क माती टाकुन पाण्याचा वापर न करताच काम करण्यात आले आहे.
काही काॅलम फाऊडेशन पासुन वाकडे उभे केले आहेत.त्यामुळे पुढे इमारत कशी उभी राहणार अशी शंका व्यक्त करण्यात आली.
बांधकामावर पाण्याचा वापर करण्यात येत नाही.,त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम दिसुन येत आहे.
या वेळी खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड ईश्वर घाडी म्हणाले की , सरकारी दवाखाण्याच्या इमारीचे बांधकाम सुरू असताना चारी बाजुन पत्र्ये उभारून काम करण्यात येत असुन प्रवेशव्दारावर कुलूप लावण्यात आले आहे.यामुळे संशय आल्याने आत प्रवेश करून बांधकामाचा दर्जा झाकला जात आहे.असे स्पष्ट केले.
या वेळी त्यानी संबधित कंत्राटदार कोठे आहे असे विचारता तो उपस्थित नव्हता. फोन संपर्क केला परंतु संपर्क होऊ शक ला नाही. या वेळी वाळूचा दर्जा ही चांगला नसल्याचे सांगीतले. वाळू शेडू,माती
मिश्रीत वापरण्यात येत असुन खानापूरात चांगल्या दर्जाची
वाळू असताना निकृष्ट दर्जाची बाहेरील वाळू मागविण्यात येत आहे.
या वेळी सोमवारी दि.१९ रोजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे नंदगड दौर्यावर येत आहे. तेव्हा त्याच्याकडे निवेदनाव्दार खानापूर सरकारी दवाखाण्याच्या इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी.अशी मागणी करणार असल्याचे सांगीतले.
भेटीवेळी खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड ईश्वर घाडी, पी एल डी बॅकेचे चेअरमन काॅट्रक्टर मुरलीधर पाटील, शिवसेना नेते के. पी पाटील,अँड.एच एन देसाई, अँड श्री लोटूकर,सुरेश भोसले, प्रकाश गावडे, काॅट्रक्टर संघटनेचे अध्यक्ष सुभाष चलवादी.विष्णु बेळगावकर,लक्ष्मण बोटेकर, मलिकार्जून मुतगी,रमेश शिंगनाथ, खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर उपस्थित होते.

