#बीईओ पी रामाप्पा यांची कांजळे शाळेला भेट!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा जंगलाने व्यापलेला तालुका आहे.जंगलभागात शिक्षकांची कम करता आहे.या कड़े लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असले तरी जंगल भागातील शालेय विद्यार्थी हुशार आहेत.शिस्तप्रिय आहेत.
निलावडे ग्राम पंचायती च्या कार्यक्षेत्रात अनेक शाळातुन शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे मोजक्याच शिक्षकामुळे शिक्षकावर कामाचा तान पडतो. तरी सुध्दा मोजकेच शिक्षक असुन ही जंगल भागातील विद्यार्थी हुशार आहेत.अशी माहिती निलावडे ग्राम पंचायतीचे सदस्य व खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यानी कांजळे पूर्व प्राथमिक मराठी शाळेला बीईऒ पी.रामाप्पा यांची भेट झाली . यावेळी बोलताना सांगीतले.
कांजळे मराठी शाळेतील माध्यान्ह आहाराचा स्वाद विद्यार्थी मोठ्या आवडीने घेतात. नियमित शाळेत विद्यार्थी हजर असतात.याचा मला अभिमान वाटतो.अनेक विद्यार्थी शिकुन वकील, शिक्षक, उद्योजक बनले आहे. असे ही त्यानी यावेळी सांगीतले.
प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक एस के पालकर यानी बीईओ पी. रामाप्पा व विनायक मुतगेकर यांचे स्वागत केले.
या वेळी बीईओ पी.रामाप्पा यानी शाळेची पाहणी केली. शाळेचा परिसर व विद्यार्थी ही चांगले आहेत. या बद्दल समाधान व्यक्त केले.
या वेळी कन्नड शिक्षक श्री. मोकोजी यानी आभार मानले.


