संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
इंटरनॅशनल चॅम्पियनशिप देहराडून येथे शॉर्ट नॉन कराटे डू स्पोर्ट्स असोसिएशन इंडिया यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत जपान कराटे बेळगाव व खानापूरच्या ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी यश संपादन केलेले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 1200 स्पर्धकांनी भाग घेतला होता. नेपाळ ,भूतान, श्रीलंका व स्वीडन या देशातील स्पर्धकांचाही समावेश होता. या स्पर्धेमध्ये मराठा मंडळ संचलित ताराराणी हायस्कूलच्या तीन विद्यार्थिनींनी भाग घेतला होता. गायत्री प्रशांत गुरव, प्रांजली ईश्वर पाटील व अदिती प्रशांत गुरव या सर्व विद्यार्थिनींना सुवर्णपदक मिळालेले आहे. या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक कौशल्य कराटे परिपूर्ण सर ब्लॅक बेल्ट इंस्ट्रक्टर श्रीमान लक्ष्मणराव यल्लाप्पा नायक सर यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेच्या पटांगणामध्ये कौतुक सोहळा अभिनंदन गौरव कार्यक्रम करण्यात आला. सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थिनीचा व पालक वर्गाचा व प्रशिक्षक सरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सर्व विद्यार्थिनींना मराठा मंडळ संस्थेच्या सन्माननीय विद्यमान अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू मॅडम यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले . मराठा मंडळ संस्थेचे जेष्ठ संचालक श्रीमान परशरामअण्णा गुरव व श्रीमान शिवाजीराव पाटील ,शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान राहुल एन जाधव व शाळेच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती अश्विनी टी पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षक श्रीमान लक्ष्मणराव यल्लाप्पा नायक यांचे प्रोत्साहन मिळाले. या यशाबद्दल शाळेमध्ये या सर्वांचा गौरव करण्यात आला इंटरनॅशनल चॅम्पियनशिप डेहराडून मध्ये यश मिळवल्याबद्दल या सर्व विद्यार्थिनींचे खानापूर तालुक्यामध्ये कौतुक होत आहे.

