संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील मच्छे येथील स्वामीनगरात श्र्वेतार्क गणेश मंदिराच्या वर्धापन दिन निमित्त मंगळवार दि. ७ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी पंचामृत अभिषेक,महा पूजा हो ऊन त्यानंतर अलंकार पूजा ,गण होम , व दुपारी १२ ते ३ यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तर सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्रातील शिवव्याख्याते व इतिहासाचे राजे अभ्यास प्रा.नितीन बनगुडे पाटील यांचे व्याख्याने आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्र्वेतार्क गणेश सामाजिक सेवा संघाच्यावतीने करण्यात आले आहे.