संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगारानी रविवार पासुन रस्ता स्वच्छता कामाला प्रारंभ केला .
या वेळी गेल्या दोन दिवसापासुन पहाटे सहा वाजता स्वच्छता कामगार येऊन विद्यानगरात रस्त्यावरील झाडे जुडपे,
वाढलेले रान, तसेच गटारी घान काढुन रास्ता स्वच्छ केला.
त्यामुळे विद्यानगरातील रस्ता स्वच्छ झाला.
विद्यानगरात रस्ता अद्याप झाला नाही.
गेल्या २५ वर्षापासुन विद्यानगरातील रस्ते अद्याप झाले नाहीत.अनेक आमदार होऊन गेले .मात्र कोणीच रस्त्याची दखल घेतली नाही.
मात्र विद्यामान आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे याभागातील नागरीकाना भेटून सीसीरोडची मागणी केली.,त्यामुळे गेल्या २५ वर्षाच्या काळानंतर पहिले आमदार ज्यानी स्वताहुन विद्यानंगरात सीसीरोडचे आश्वासन दिले.त्यामुळे विद्या नगरातील नागरीकानी आमदाराचे आभार मानले.

