#विनायक मुतगेकर यांच्यानेतृत्वाखाली डी एफ ओ च्याकडे मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बांदेकरवाडा,आंबोळी,मुघवडे कांजळे निलावडे आदी भागात गेल्या पंधरा दिवसापासुन ९ हत्तीच्या कळपाने ऊस, केळी, चिकू, तसेच सुपारीच्या झाडांचे प्रचंड नुकसान के ले आहे.तेव्हा या हत्तीचा बंदोबस्त करावा. अथवा स्थलांतर करावे.अशी मागणी खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघाचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांच्यानेतृत्वाखाली जिल्हा वनअधिकारी क्रांति यांच्याकडे केली.
ऐन ऊसाच्या गळीत हंगामात हत्तीनी “बांदेकरवाडा,आंबोळी,मुघवडे कांजळे निलावडे ” आदी भागातील ऊसाच्या फडात धुमाकुळ घालुन पिकांचे नुकसान केले. एवढेच नव्हे तर केळी , चिकू, सुपारी झाडांचे नुकसान केले आहे.
त्यामुळे शेतकर्याना शेतात जाणे मुश्किल झाले आहे.तेव्हा हत्तीचा बंदोबस्त करा.अथवा त्याचे स्थलांतर करा अली मागणी केली.
या वेळी जिल्हा वन अधिकारी क्रांति म्हणाले की तुमच्याकडे पाचच हत्ती आहेत.तर आमच्याकडे ५० हत्ती आहेत.आम्ही काय कराव.असा खुळसट प्रश्न करून गेलेल्याना निरूत्तर केले.
मात्र शेतकर्यानी हत्तीचा बंदोबस्त केला नाहीतर जांबोटी खानापूर महामार्गावर सस्ता रोकोचा ईशारा दिला.येत्या दिवसात जिल्हा वनधिकार्यानी भेट दे ऊन हत्तीचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी विनायक मुतगेकर, राजू धुरी,रमेश नाईक, मोतापा गावडे सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

